सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील एकाने एका ४४ वर्ष महिलेच्या घरी जाऊन गैरवर्तन केल्याने एकावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, संतोष खोमणे यांच्याकडे सावकारी करण्याचा कसलाही परवाणा नसताना येथील एका महिलेस विटभट्टी व्यवसाया करीता १ लाख रुपये व्याजाने दिलेले होते त्याबद्दल तिच्या पतीने संतोष खोमणे यांना वेळावेळी व्याजाची रक्कम देवुन सुध्दा संतोष खोमणे याने महिलेच्या पती कडे घरी जाऊन वेळोवेळी व्याजाचे पैशाची मागणी करीत होता.
दि. १८ रोजी सायंकाळी ७ वाजता संतोष खोमणे याने फिर्यादी महिलेच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करुन तिला पाठीमागून दोन्ही हातानी कवळ मारुन जवळ ओढून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिच्या डावे गालावर चापट मारुन, डोक्याचे केस ओढले तिला सोडविण्या करीता तिचा पती व पुतण्या आले असता आरोपी संतोष खोमणे याने तिच्या पतीस शिवीगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष खोमणे याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत.