सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसमुळे वारवंड ता.भोर येथील अशोक बबन मोरे, आनंदा खंडू दिघे व राजाराम विठोबा दिघे यांच्या घरांच्या भिंत तसेच छत कोसळून मोठे नुकसान झाले आहे.मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच तलाठी पंडित ,विस्तार अधिकारी विजय कोळी ,ग्रामसेवक सोनवणे तसेच सर्कल लहारे यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून तातडीने पंचनामे केले.यावेळी गावातील सरपंच लक्ष्मण दिघे,उपसरपंच संतोष दिघे,पोलीस पाटील सुधीर दिघे,ग्रा.पं.कर्मचारी शंकर मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.