सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : प्रतिनिधी
पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षपदी मांढर (ता.पुरंदर) येथील रहिवाशी तानाजी शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली सासवड येथे पुरंदर अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पुणे जिल्हा माध्यमिक संघाच्या अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तानाजी शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांच्यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. निवडीनंतर तानाजी शिर्के यांचा सेकंडरी स्कूल सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आत्माराम शिंदे तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले आहे.
..