धक्कादायक..! संतोष म्हस्के ! दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून २० वर्षीय नातवाकडून ७० वर्षीय आजोबाचा खून : भोर तालुक्यातील आपटी येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खोऱ्यातील आपटी ता.भोर येथे नातुला आजोबाने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून नातू प्रथमेश आनंदा पारठे वय-२० याने आजोबाच्या डोक्यात लाकडी बॅट घालून खून केल्याची घटना शनिवार दि.२० घडली.                                                 भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटी ता. भोर येथे दि.२० रात्री आठच्या दरम्यान आरोपी प्रथमेश आनंदा पारठे रा.आपटी यांने आजोबा यांच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले असता आजोबांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांच्याच घरासमोर लाकडी बॅटने आजोबा नथू कोंडीबा पारठे वय-७० यांना जखमी करून जीवे ठार मारून त्यांचा खून केला असल्याची घटना घडली.फिर्यादी दत्तू कोंडीबा पारठे यांनाही तुम्ही इथे थांबायचं नाही असं दम देऊन आरोपी नातू फरार झाला आहे.याप्रकरणी आरोपी प्रथमेश पारठे विरुद्ध भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

                                   
To Top