महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी केशवराव जाधव

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील केशवराव बबनराव जाधव यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 
          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा नुकतीच पुणे येथे शिक्षक भवन येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष  राजाराम वरुटे होते. यावेळी शिक्षक नेते माधवराव पाटील उपस्थित होते. तीन वर्षासाठी ही निवड झाली असून कार्याध्यक्षपदी लोमेश वराडे, सरचिटणीस लायक पटेल तर कोषाध्यक्ष संभाजी बापट यांची निवड करण्यात आली आहे. 
         केशवराव जाधव हे २००८  पासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस म्हणून काम पाहत होते.
To Top