सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे मोरगाव रस्त्यावर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या युवकाला पिकअप वाहनाची धडक बसून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.(२१) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली.
यासंदर्भात सुपे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुपे मोरगाव रस्त्यावरून पिकअप जीप नंबर एम.पी.४६ जी.२६३८ वरील चालक डोंगरसिंग टेलर मेहता (वय ३५) रा.सालीकल्ला राजपूत ता.बडवाडी,मध्यप्रदेश हा मजूर घेऊन सातारा जिल्ह्यातील पुसेगांव येथे आले आणण्यासाठी निघाला होता.वेगात असणाऱ्या गाडीवरील ताबा सुटल्याने सुपे नजीक असणाऱ्या माऊली लॉन्स मंगल कार्यालयासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूने कडेने चालणाऱ्या नाजीम फरीद शहा (वय २२) उत्तरप्रदेश,सध्या रा.सुपे,बारामती यांस जोरात धडक मारून गंभीर जखमी केले .त्यास तातडीने सुपे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यु झाला आहे. यासंदर्भात पुढील तपास सुपे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक एस.जी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाऊसाहेब शेंडगे ,अंमलदार दत्तात्रय जाधव करीत आहेत