बिग ब्रेकिंग ! बस मागे घेताना एकाचा चिरडून मृत्यू ! बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ट्रॅव्हर्स बस पाठीमागे घेताना झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. ही घटना श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदीर(ता. बारामती) येथे रविवार(दि.२१) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. गणेश रत्नाकर पाटील( वय, ६४ रा. वजीरा कोळीवाडा एलटीरोड, बोरीवली वेस्ट मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
       याबाबत विनायक नारायण कोळी (जीएसटी अधिक्षक पालघर )यांनी वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल चौकीत खबर दिली आहे. सालाबादप्रमाणे हे कुटुंब कोल्हापूर, पंढरपूर, आदमापुर येथील देवदर्शन करून रविवारी सोमेश्वर येथे आले होते. सांगली येथील अरिहंत ट्रॅव्हर्सची बसही सोमेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी आली होती.मंदीरातील अंतर्गत रस्त्यावर बस मागे घेताना चालकाला अंदाज न आल्याने मागे चालत जाणाऱ्या पाटील यांना धक्का लागला यात त्यांच्या अंगावरुन बस गेल्याने पाटील यांचा जागीच म्रूत्यु झाला. ट्रॅव्हर्स वरील बस चालक निखील नागेश खोत(रा. देवेंद्र अपार्टमेंट, विश्रामबाग, ता. मिरज जि. सांगली) याने हलगर्जीपणाने, अविचाराने बस चालवत अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप पाटील कुटुंबाने केला असून वडगाव पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे. वडगाव निंबाळकरचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार पुढील तपास करत आहेत. 
To Top