सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त धनगर समाज सेवा संघ भोर यांच्यावतीने नगरसेविका अमृता प्रशांत बहिरट यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करीत अभिवादन करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात शेकडो समाजबांधवांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.यावेळी अमर बहीरट,सचिन बहिरट, कल्याण नरोटे, चंद्रकांत बहीरट, दीपक काटकर ,पांडुरंग नाचन ,राजेंद्र भादेकर, प्रकाश काटकर ,नंदू बहीरट,डॉ. नितीन डफळ,संतोष कुचेकर ,सुरेश बहीरट, मनोज भादेकर, पोपट पिसे ,प्रशांत बहीरट ,चेतन भादेकर,प्रवीण काटकर, ज्ञानेश्वर भोजने आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.