सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी E - KYC करून घेणे बंधनकारक असून केवायसी केलेली नसेल तर पीएम किसान योजनेचे मिळणारे अनुदान बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी केवायसी करणे अनिवार्य आहे असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही अशा लाभार्थ्यांच्या याद्या तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक यांच्याकडे प्राप्त आहेत.लाभार्थ्यांनी यादीतील नावाची खात्री करून आधार कार्डद्वारे ई- केवायसी करणे अनिवार्य आहे.ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी होणार नाही अशा लाभार्थ्यांचे पीएम किसान योजनेचे यापुढील अनुदान त्यांचे बँक खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ई-केवायसी करणे केंद्र शासनाने बंधनकारक केलेले आहे.लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा जवळचे महा-ई-सेवा केंद्र ,सेतू सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र याद्वारे ई- केवायसी करून घ्यावी.याबाबत काही अडचणी आल्यास तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.