कौतुकास्पद.... ! वाघळवाडीत विधवा प्रथा बंद ...! विधवा पुनर्विवाह ५० हजार रुपये व मुलगी जन्माला आल्यास ३ हजार रुपये : सरपंच नंदा सकुंडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी गावामध्ये महिला ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत  १० % महिला व बालविकास या ग्रामनिधी मधून विधवा पुनर्विवाह साठी ५०,०००/- (पन्नास हजार ) रुपये व मुलगी जन्माला आल्यास ३०००/- (तीन हजार) रुपये असे विविध  ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष.कविता म्हेत्रे यांनी एकल महिला सन्मान दशा आणि दिशा या विषयावर सर्व महिलांचे समुपदेशन व मार्गदर्शन केले विधवांना समाजात कशाप्रकारे वागणूक दिली जाते लहानपणापासून मुलगी जन्मला आल्या पासून ते मरेपर्यंत मुलगी स्त्री जातीला किती यातना सोसावे लागतात जर पतीचे निधन झाले असेल तर किती अडचणींना सामोरे जावे लागते  त्या परिस्थितीमध्ये महिलांनी कशाप्रकारे स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वतःचा सन्मान वाढवायचा त्याबद्दल त्यांनी मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले व इतर महिलांचे उदाहरणे दिली. तसेच सावित्रीबाई फुले हे एक पात्री त्यांनी नाटक करून महिला सक्षमीकरणाचे जनजागृती केली. 
गावातील १७८ विधवा महिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी कुंकू लावून, साडीचोळी, पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान करण्यात आला तसेच उर्वरित  उपस्थित ३०० महिलांचा गुलाब पुष्प व ओटीभरण करून सन्मान करण्यात आला. या सभेस व कार्यक्रमात जवळपास ४५० ते ५०० महिलांनी सहभाग नोंदवला.  लोकनियुक्त सरपंच  नंदा सकुंडे यांनी आपल्या मनोगत मध्ये खा. शरद पवार ना. अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांनी महिलांना दिलेले आरक्षण त्याबद्दल आभार व्यक्त केले व त्यामुळेच आज या ठिकाणी मी बोलू शकले तसेच यापुढे गावातील महिलांना एकल, परीतकत्या, व इतर महिलांना सामावून घेऊन त्यांच्यासाठी काम करत राहणार असं त्यांनी बोलून दाखवलं त्यानंतर त्यांनी गावातील विधवा महिला पुनर्विवाहासाठी ग्रामपंचायत महिला व बालविकास निधीमधून मधून 50 हजार रुपये व गावात मुलीचा जन्म झाल्यास त्या मुलीच्या खात्यावर 3 हजार रुपये हा ठराव मांडला या ठरावास अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य शीला सावंत, ज्योती कडाळे यांनी दिले व सर्व  महिलांनी सर्व ते ठराव मंजूर करण्यात आला.

 बारामती तालुका महिला राष्ट्रवादी सरचिटणीस सुचिता साळवे, बचत गट अध्यक्ष मनीषा सकुंडे यांनीही आपले महिलांबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य अंगणवाडी शिक्षिका छाया जाधव, वाबळे मॅडम व आशा सेविका लता सावंत, ताटे, शैला जाधव, मालन साठे यांनी घरोघरी जाऊन एकल महिलांना या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास सांगितले. या कार्यक्रमास उपसरपंच .जितेंद्र सकुंडे ग्रामपंचायत सदस्य .शीला सावंत,.ज्योती कडाळे, .पांडुरंग भोसले, हेमंत गायकवाड ग्रामविकास अधिकारी श्री.नरसिंग राठोड युवा नेते .तुषार सकुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे स्वागत व आभार सरपंच .नंदा सकुंडे मानले सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापिका  प्रियांका तांबे यांनी केले.
To Top