सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
किसनवीर कॉलेज मधील जुन्या भांडणाचा राग
मनात धरून व्याजवाडी ता.वाई येथील केतन पिसाळ या तरुणाची दुचाकी शिरगाव घाट ऊतारा वर आडवुन खडकी ता.वाई येथील आदित्य ढमाळ व इतर तीन साथी दारांनी रस्त्यात खाली पाडून लाथा बुक्यांनी आणी लोखंडी सळईने मारहाण केली त्या वेळी रक्त बंभाळ झालेल्या केतनने जखमी अवस्थेत मित्रांच्या मदतीने भुईंज पोलिस स्टेशन गाठले.
आणी तेथे ऊपस्थित असलेले सपोनि आशिष कांबळे यांची थेट भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली .त्यांनी जखमीला तातडीने ऊपचारासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले त्या वेळी जखमीला ३ टाके पडल्याचे समजले या वेळी जखमी केतन पिसाळ याने भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
भुईंज पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की व्याजवाडी ता. वाई येथील रहिवासी असलेला आणी किसनवीर महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला केतन किशोर पिसाळ वय २२ हा दि.२८ |७| २२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास किसनवीर महाविद्यालय सुटल्या नंतर आपल्या व्याजवाडी गावा कडे जाण्या साठी वाईच्या एसटी स्टँडवर आला असताना त्या वेळी त्या ठिकाणी कॉलेज मधीलच आदीत्य ढमाळ राहणार राहणार खडकी ता.वाई या दोघांन मध्ये किरकोळ बाचाबाची झाली नंतर ती भांडणे त्याच वेळी आपसात तडजोड होऊन मिटली होती दि.२९ |७| २२ रोजी केतन हा निरा येथील आपल्या नातेवाईकांन कडे दुचाकी वरुन गेला होता तो तेथुन केतन हा दि. ६| ८| २२ रोजी पुन्हा व्याजवाडी या आपल्या गावाकडे जाण्यासाठी तो सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निघाला होता त्याची दुचाकी शिरगाव घाट ऊतारुन खाली येत असताना त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेले आदीत्य ढमाळ व त्याचे इतर ३ साथीदार दोन दुचाकी वरुन येवुन बसलेले होते या चौघांनी केतनची दुचाकी आडवली आणी त्याला खाली रस्त्यावर पाडुन त्याला लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली एवढ्या वर त्यांचे समाधान झाले नसल्याने आदीत्य याने उजव्या डोळ्याच्या वरील भागा वर लोखंडी सळईने जोरदार हल्ला केल्याने केतन गंभीर जखमी झाला त्या नंतर मारेकरी तेथुन पळून गेले . याची माहिती त्याने आपल्या मित्रांना मोबाईल वरुन दिली मित्र तात्काळ केतनच्या मदती साठी धावुन आले व जखमी केतनला घेऊन त्यांनी थेट भुईंज पोलिस ठाणे गाठले व तेथे ऊपस्थित असलेले सपोनि आशिष कांबळे यांना घडलेल्या प्रकाराची माहिती सांगितली त्या वेळी जखमी केतनला सपोनि आशिष कांबळे यांनी औषधे ऊपचारा साठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले तेथे त्याच्या वर ऊपचार झाल्या नंतर रितसर केतनची तक्रार दाखल करून घेतली पण अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने व्याजवाडी ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे .