बारामती ! तालुक्यातील ५९४ शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा : प्रतीज्ञापत्राद्वारे एकसंध राहण्याचा निर्णय

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शिवसेनेच्या  ५९४ पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची प्रतीज्ञापत्र तयार करुन ठाकरे यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला असल्याची माहिती पुणे जिल्हा  शिवसेना सह संपर्क प्रमुख ॲड. राजेंद्र काळे यांनी दिली.
             शिवसेना पक्षामध्ये दुफळी झाली असून ४० आमदारांनी बंडखोरी करीत सत्ता स्थापन केली आहे . मुळ शिवसेना पक्षामध्ये फुट झाली असल्याने  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे अशी  विभागणी झाली आहे. यामुळे बारामती तालुक्यातील ५९४  शिवसेना  पदाधीकारी  व कार्यकर्त्यानी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती निष्ठा व्यक्त  केली आहे. तर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वास बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रतीज्ञापत्र तयार केली आहेत.

 पुणे जिल्हा सह संपर्क प्रमुख ॲड .राजेंद्र काळे, बारामती तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे, उपतालुका प्रमुख मंगेश खताळ , अजित जगताप , सुदाम गायकवाड, पुणे जिल्हा वाहतूक सेना प्रमुख दतात्रय लोणकर ,पुणे जिल्हा युवासेना चिटणीस परेश भापकर , ग्राहक संरक्षण तालुकाध्यक्ष बाळासाहेब भापकर आदींनी प्रतीज्ञापत्र तयार केली आहेत . तसेच शिवसेनाबरोबर एकनिष्ठ व एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे .
To Top