कौतुकास्पद ! बारामती ! सुप्यात तर पाऊस पण नाही...! पण पावसाच्या भुरभुरीने पोलीस ठण्यात उगवलं गवत...! मंग काय एएसआय जेंव्हा पाठणीवर पंप घेऊन स्वतः औषध फवारणी करतात...!

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे पोलीस ठाण्यातील असिस्टंट सब इन्स्पेक्टर दत्तात्रय जाधव यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील उगवलेले गवत पाहून स्वतःच औषधांचा पंप खांद्यावर घेऊन औषध औषध फवारणी केली आहे. त्यांच्या या कामाचे परीसरातून कौतुक होत आहे. 
           सध्या पंधरा दिवस झाले सगळीकडे संततधार पाऊस चालू आहे आणि याच पावसामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात गवताचे तण उगवले आहेत असाच या गवताच्या आणी काॅग्रेस गवत या तणाने सुपा येथील पोलिस चौकीला मोठ्या प्रमाणात उगवले होते. आणि तणाची वाढ मोठ्या प्रमाणात असल्याने सुपा पोलिस चौकीचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर दत्तात्रय जाधव यांनी आपल्या पदाची कोणतीही तमा न बाळगता एक शेतकऱ्यांकडून फवारणी करण्याचा पंप आणुन हे तण पुर्णपणे नष्ट करण्यासाठी स्वताच्या खांद्यावर पंप घेऊन संपुर्ण पोलिस चौकीच्या आवारात फवारणी केली त्यांच्या या कामाचे आजूबाजूच्या लोकांनी कौतूक केले.
To Top