भोर ! दुर्गम भागात पावसाचा कहर सुरूच : कोंडगाव हुंबेवस्तीवरील पुल पावसाच्या पुरात गेला वाहून

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मागील आठ दिवसापासून भोर तालुक्यात सर्वत्र वादळी पावसाने थैमान घातले आहे. भाटघर धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील दुर्गम-डोंगरी भागातील वेळवंड खो-याचे शेवटचे टोक असलेल्या कोंडगाव परिसरात  झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे.येथील हुंबेवस्तीवरील महत्वाच्या रहदारीचा येण्या -जाण्याचा पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे.त्यामुळे वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटला असून भात शेतात माती मिश्रित गाळ वाहुन आला आहे तर शेती पाण्याखाली गेली आहे.                           कोंडगाव-सांगवी परिसरात पावसाचा जोर कायम असून काही ठिकाणी दरड ,शेतीचे बांध, ताली, कोसळल्या आहेत.अतिवृष्टीमुळे मागील काही दिवसापासुन विजेचा प्रवाह खंडित झाल्याने नागरिक अंधारात आहेत असे पोलीस पाटील हुंबे यांनी सांगितले. 
To Top