वाई येथे रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वाई येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले . 
       सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत गोरड उपविभागीय कृषी अधिकारी वाई हे होते. चंद्रकांत गोरड उपविभागीय कृषी अधिकारी वाई यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना रानभाज्यांना मानवी आहार व आरोग्याचे दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असल्याचे महत्त्व सांगितले.
रानभाजी महोत्सवाचे उदघाटन गीतांजली गरड नायब तहसीलदार वाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी निसर्गात उपलब्ध होणाऱ्या परंतु आपल्याला ओळख नसलेल्या  व रोजच्या आहारात अनन्य साधारण महत्व असलेल्या  रानभाज्यांचे महत्त्व समजून सांगितले.
रानभाजी महोत्सवमध्ये  आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांनी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी  चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, भालगा, शेंडवेल, आर्वी, बांबू,तरोटा,केळफुल, अळू, पुदिना, डेसा, काटेमाठ,आघाडा,सुरण, टाकला, कपाळफोडी, ब्राम्ही,चुका,पिंपळ गवती चहा, कडीपत्ता, कूर्डू, कोहळा, चिघळ, भुई अवळी, भारांगी,अश्या अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या व पाककृती बाबत माहिती जाणून घेतली. सदर महोत्सवास नागरिकांनी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सकारात्मक व चांगला प्रतिसाद दिला.
          या रानभाज्या महोत्सवाचे  प्रस्ताविक  श्री प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांनी व सूत्रसंचालन श्री प्रदीप देवरे बीटीएम आत्मा यांनी केले. कार्यक्रमास  श्रीमती वैशाली जायगुडे निवासी नायब तहसीलदार, वाई, ममता भंडारे नायब तहसीलदार महसूल,  वैभव पवार नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी वाई कार्यालय, सर्व मंडल कृषी अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषी सहाय्यक, एटीएम आत्मा, तसेच प्रगतशील शेतकरी रोहिदास बापू पिसाळ,  अर्जुन फरांदे,  सागर जमदाडे, सचिन चौधरी,  सुनिल राजपुरे, बाजीराव भोसले,तालुक्यातील शेतकरी व  ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top