सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मौजे मुरूम येथे गोकुळ-अष्टमी निमित्ताने श्री जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आज शुक्रवार दि- १२ ऑगस्ट २०२२ रोजी सुरुवात झाली. प्रसन्न व भक्तिमय वातावरणात ग्रंथ, विणा, कलश, प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप , संचालक राजवर्धन शिंदे, नामदेवराव शिंगटे हे मान्यवर उपस्थित होते तसेच येथील मुरूम येथील आबालवृद्ध ग्रामस्थ,तरुण वर्ग व महिला वर्ग उपस्थित होत्या.
हा भक्तिरसाचा कार्यक्रम आठ दिवस चालणार आहे यात ह.भ.प बंडातात्या कराडकर, ह.भ.प रामरावजी ढोक महाराज, ह.भ.प हरी महाराज यादव असे नामवंत कीर्तनकार येणार आहेत. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे समस्त ग्रामस्थ मुरूम यांच्यावतीने आव्हान करण्यात येत आहे.