सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : चंद्रकांत भाट
चिंचवाड तालुका शिरोळ येथील चंपाबाई भुपाल ककडे यांच्या खून प्रकरणी शिरोळ पोलिसांनी शुक्रवारी आणखीन एक संशियत आरोपी बजरंग उर्फ बाजीराव वसंत नंदीवाले वय 34 वर्षे राहणार राजीव गांधी नगर नंदीवाले वसाहत शिरोळ यास अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
याबाबत शिरोळ पोलिसांनी सांगितले की शनिवार दिनांक 30 जुलै रोजीच्या रात्री चिंचवाड येथील नंदीवाले वसाहतीमधील ककडे मळात राहणाऱ्या चंपाबाई भुपाल ककडे यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन अज्ञात इसमानी पोबारा केला होता याबाबतची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या प्रकरणी कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने शिरोळ नंदीवाले वसाहती मधील प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण नंदीवाले यास अटक करून त्याच्याकडून खुनाचा गुन्हा कबूल करून घेतला होता त्यास शिरोळ पोलीस ठाण्यात अधिक तपासण्यासाठी ताब्यात देण्यात आले होते प्रकाश नंदीवाले यास न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस तपासात प्रकाश नंदीवाले यांनी खुनाची कबुली दिली आणि यामध्ये बजरंग उर्फ बाजीराव वसंत नंदीवाले याचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले तसेच त्याने व बजरंग नंदीवाले यांनी क सौ चंपाबाई ककडे यांचा खून कसा केला याची माहिती पोलिसांना देत असताना प्रकाश याने सांगितले की चोरीच्या उद्देशाने प्रकाश व बजरंग नंदीवाले यांनी चंपाबाई ककडे त्यांच्या घरावर दोन दिवस पाळत ठेवली होती दि.३०जुलै रोजी प्रकाश नंदीवाले व त्याचा मित्र बजरंग नंदीवाले, असे दोघेजण रात्री ०८ ३० वा.चे सुमारास ककडे मळा येथे राहणारी चंपाबाई ककडे मावशी यांच्याकडे कडे पाणी मागण्याचा बहाना करून तीचे गळयात हात घालून सोन्याचे दागीने काढत असताना झालेल्या झटापटीत प्रकाश नंदीवाले याच्या डोक्यावरील टोपी खाली पडल्याने तीने प्रकाशला ओळखुन थांब तुझ्या आईला सांगतो, असे मोठ्याने ओरडू लागली. त्यावर बजरंग उर्फ बाजीराव नंदीवाले किचनमध्ये आला. यावेळी प्रकाशने चंपाबाई ककडे यांचा गळा दोन्ही हाताने दाबुन धरला. इतक्यात बजरंगने त्याचे एका हाताने, त्यांचे तोंड दाबुन धरले दोघांनी मिळून चंपाबाई ककडे यांना भिंतीसोबत दाबुन धरले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर प्रकाश आणि बजरंग या दोघांनी चंपाबाई ककडे यांना फरशीवर सोडले, इतक्यात प्रकाश तु सोन काढून घे, मी बाहेर कोणी येते का ? ते बघतो. असे म्हणुन बजरंग किचन मधुन बाहेर गेला. त्यानंतर प्रकाशने चंपाबाई ककडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिन्यापैकी एक. मंगळसूत्र फिरकीतून काढून घेतले, दुसरे निघाले नाही म्हणून तोडून काढले. त्यानंतर कानातील फुले काढून सर्व दागीने खिशात घालून किचनमधुन बाहेर गेला. त्यावेळी बजरंग तेथे त्याला दिसला नाही. म्हणून प्रकाश घाबरुन घरालगत असलेल्या उसाचे पिकात जावून बसला. अशी माहिती सांगितल्याने शिरोळ पोलिसांनी गुरुवारी रात्री बजरंग उर्फ बाजीराव वसंत नंदीवाले यास अटक केली त्यानेही आपला मित्र प्रकाश नंदीवाले याच्यासोबत हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली त्यामुळे त्याला जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करीत आहेत
सदरची कारवाई शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे दत्तात्रय भोजने पोलिस अमलदार ज्ञानेश्वर सानप प्रदीप कुंभार संतोष जाधव ताहीर मुल्ला गजानन कोष्टी संजय राठोड रहिमान शेख यांच्या पथकाने केली