भोर ! 'ध्रुव'चा गरीब विद्यार्थ्यांना 'मदतीचा हात' : ध्रुव प्रतिष्ठानने ६६ विद्यार्थ्यांना फाटके दप्तर दिले बदलून

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यात गोरगरिब नागरिकांना तसेच दुबळ्या शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे म्हणून ध्रुव प्रतिष्ठानची ओळख आहे.टीटेघर ता.भोर येथील ध्रुव प्रतिष्ठानने सध्या नवीन उपक्रम राबवीत शाळा भरताना किंवा सुटतेवेळी तसेच विद्यार्थी रस्त्याने येताना -जाताना ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर  फाटके दप्तर असेल त्यांना नवीन दप्तर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ६६ विद्यार्थ्यांना नवीन दप्तर तातडीने बदलून दिली आहेत.                                                     शाळेत जात असताना कोणतीही खंत मनात न राहता विद्यार्थी आनंदाने शाळेत गेला पाहिजे.हाच या उपक्रमा मागचा ध्रुव प्रतिष्ठानचा उद्देश असल्याचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात आनंद फुलून येत आहे तर पालकांकडून उपक्रमाचे अभिनंदन केले जात आहे.यावेळी राहुल खोपडे, सिध्दी नवघने,योगीराज केळकर तसेच पालक उपस्थित होते.

To Top