सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील आमचं छोटंसं गाव करंजे या गावाला तसा खुप ऐतिहासिक वारसा आहे , तो म्हणजे या गावाला खुप वर्षापासून सोमायचे करंजे असे नांव आहे , आणि त्याच गावात एक छोटीसी वस्ती आहे गायकवाड वस्ती (बागेचा मळा ) आणि याचं वस्तीकडे गेली कित्येक वर्ष रस्ता नाहीं , जाण्यासाठी पुल नाहीं तर ओढ्यातून ये जा करावी लागते.
आज आपण देश स्वंतत्र होऊन ७५ वर्ष झाली यानिमित्त सुवर्ण उत्सव साजरा करत आहोत आणि आपला देश आज एक महाशक्ती म्हणुन वाटचाल करत आहे आणि जर आपल्याच देशातील, आपल्याच राज्यातील, आपल्याच तालुक्यातील, आणि आपल्याच वाडी वस्तीवरील नागरिकांना , महिला भगिनी, शाळेत जाणारी लहान मुले, शेतकरी , विद्यार्थांना शाळेत जात असताना जर या ओढ्यात, चिखलात जर अपघात झाला तर याठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकत नाही , शेतकरी रात्री अपरात्री शेतीच्या कामासाठी बाहेर पडत असतात , महिला भगिनी सुद्धा कामानिमित्त बाहेर पडत असतात आणि या लोकांना फोटोत दाखवल्याप्रमाणे चिखल तुडवत एका ओढ्यातून जावे लागते , गेली कित्येक वर्षांपासून रस्ता नाही पुल नाहीं अशा अवस्थेत ही लोकं रोज पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो अशा परिस्थितीत जगत आहेत , आणि संबधित प्रशासनाकडे जर मदत मागितली तर आज काम होईल उद्या होणार अशा प्रकारची उत्तरे मिळत आहेत ,