शिरवळ ! पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीत सराईत आरोपी जेरबंद : शिरवळ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ पोलीस ठाणे येथे दि.  १३/०८/२०२२ रोजी फिर्यादी महेश उत्तम गायकवाड यांचे मालकीची मारुती सुझुकी कंपनीची इको वाहन हे चोरी झालेबाबत गुन्हा दाखल करणेत आलेला होता. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे व शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ मदने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ श्री राजकुमार भुजबळ यांना सुचना दिल्या होत्या.
        सदर वाहनाचा व आरोपींचा शोध सुरु असताना शिरवळ पोलीस ठाणेचे डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदरच्या इको कारच्या लोकेशन बाबत गोपनिय माहिती मिळाली. सदर इको कार हि मांजरी बु हडपसर पुणे या ठिकाणी उभी असल्याने त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा शिरवळ पोलीस ठाणेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश आंदेलवार, पो.ना. नितीन महांगरे, पो. कॉ.प्रशांत वाघमारे, पो.कॉ. मंगेश मोझर यांनी स्थानिक हडपसर पोलीस ठाणे कडील पो.हवा. डेरे, पो. हवा. क्षीरसागर, पो. कॉ. रेजीतवाड यांच्या मदतीने दबा धरुन त्याप्रमाणे इको गाडी घेऊन जाणेकरीता रात्रीच्या वेळी आलेले रेकॉर्ड वरील सराईत दोन आरोपी यांना शिताफिने जेरबंद करण्यात शिरवळ पोलीस ठाणे कडील डीबी पथकाला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपी विरुध्द पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे ग्रामिण मधील विविध पोलीस ठाणे जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे एकुण ३३ गुन्हे दाखल आहेत.
        
सदर कामगिरी अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा,अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार व कर्मचारी पोलीस अंमलदार सचिन वीर,आप्पासाहेब कोलवडकर,जितेंद्र शिंदे,नितीन महांगरे,प्रशांत वाघमारे.मंगेश मोझर,सुनिल मोहरे यांनी केली.

To Top