सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या वाहतुकीच्या भोर-आंबाडखिंड मार्गावर मागील पंधरा दिवसांपासून शेकडो मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून या मार्गावरील वाहन चालक मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यामुळे त्रस्त झाले आहेत.
भोर-आंबाडखिंड घाट मांढरदेवी मार्गे वाई, पाचगणी ,महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते.मागील पंधरा दिवसापासून भोर आंबाडखिंड मार्गावर शेकडो मोकाट कुत्री वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत.या मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकी व चार चाकी वाहन चालकांचे छोटे- मोठे अपघात होत आहेत.यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित विभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.