पुरंदर व बारामतीच्या जिरायती भागाला दिलासा : नाझरे धरण ९७ टक्के भरले : लवकरच स्वयंचलित २६ दरवाजे उघडणार?

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
बारामती व पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेले नाझरे धरण ९७ टक्के भरले असून उद्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. 
         नाझरे धरण जलाशय पातळी स. ८.०० वा ६७६.९३ मी.आणि एकूण पाणीसाठा २१.९६१ दलघमी (९७.०० %) इतका झाला असून नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू आहे. 
         पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येण्याचा दर पाहता पूढील ६ ते ७ तासात प्रकल्पातील पाणीसाठा १०० % होण्याचा अंदाज असून त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्या नुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत विसर्ग सुरु होऊ शकतो.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया कर्‍हा नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.
To Top