बारामती ! हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम निंबुत येथे मोठ्या ऊत्साहात साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ईमामे हुसेन यांच्या बलिदानाचे प्रतिक म्हणून साजरा होणारा मोहरम हा पारंपारिक सन निंबुत ता बारामती येथे मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.
          या वर्षाचा मान कै.रमजानभाई बुडणभाई सय्यद(मास्तर) यांचे चिरंजीव हनिफभाई सय्यद,मन्सूरभाई सय्यद,जुम्मनभाई सय्यद यांचे कडे होता.दि.8/08/22हा सनाचा पहीला दिवस खत्तलची राञ म्हणून ओळखली जाते.या दिवसी निंबुत,निरा, सोमेश्वरनगर,गुळुंचे,पाडेगाव, परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शन घेऊन खिचडी भात ,मेथीची भाजी व गोड शरबतचा नैवेद्य अर्पण केला. सर्व भाविकांना मन्सूरभाई सय्यद व कुटुंबियां कडून सरबतचे वाटप करण्यात आले.मोहरमचा दुसरा दिवस  योमे आशुरा म्हणुन ओळखला जातो या दिवशी ताबुतची मिरवणूक संपुर्ण गावातून काढण्यात आली व नंतर निरा नदीच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.या सर्व कार्यक्रम पार पाडण्यात अजिम कुरेशी, दस्तगीर सय्यद, सुफियान सय्यद, सकलेन  सय्यद,तौफिक सय्यद, राजुभाई सय्यद, रियाज सय्यद,ताहीर सय्यद, सलमान सय्यद,रियाज शेख, जावेद शेख, सत्तार ईनामदार,नजिर सय्यद,यांनी मोलाचे सहकार्य केले.
To Top