सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका कृषि विभागाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत वाई येथे आयोजित केला आहे. रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज आहे . रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलै च्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या रानभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने रानभाज्यांच्या महोत्सवांचे सुसज्य आयोजन केले आहे.श्रावण महिन्यात निसर्गात उपलब्ध होणाऱ्या परंतु आपल्याला ओळख नसलेल्या व रोजच्या आहारात अनन्य साधारण महत्व असलेल्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री मेळावा दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेर्यंत आयोजित केला आहे तरी वाई तालुक्यातील आरोग्य प्रति जागरूक असणाऱ्या नागरिकांसाठी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी चुका, गुळवेल, करटुली, पाथरी, अंबाडी, केना, बांबू,तरोटा,केळफुल, अळू, पुदिना, डेसा, भारांगी,अश्या अनेक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या रानभाज्या खरेदी करता येणार असून तालुक्यांतील शेतकरी/शेतकरी गट/युवक मंडल/उमेद संघ/महीला गट/शेतकरी उत्पादक कंपनी या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाज्या खरेदी कराव्यात व आरोग्यवर्धक रानभाज्याचा आहारात समावेश करावा असे आव्हान श्री चंद्रकांत गोरड उपविभागीय कृषी अधिकारी व प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात नागरिक फास्ट फूड कडे जास्त आकर्षित होत आहे .त्यामुळे पूर्वीच्या रानभाज्या ,त्यांची ओळख,आहारातील महत्त्व नागरिकास होणे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे .या अनुषंगाने रानभाजी बाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी म्हणून तालुका कृषी विभाग वाई यांचे वतीने भव्य दिव्य असे रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ज्या शेतकऱ्यांना रानभाज्या विक्री करायचे असतील त्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तरी संपर्कासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई येथे संपर्क साधावा.