सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
तीन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम मशीन फोडून आठ लाखाची रोकड लंपास केली. ही घटना पुणे सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर या ठिकाणी मंगळवारी (दि.९) पहाटेच्या दरम्यान घडली. ही चोरी तीन अज्ञात चोरट्यांनी केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले.
सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पुणे जिल्हा ग्रामीण चे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते. यादरम्यान श्वानने बोगद्याच्या दिशेने चोरांचा माग काढला.
सदर एटीएम मशीनला सिक्युरिटी गार्ड नसून आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चांगल्या प्रतीचे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी करीत आहेत.
फोटो पाठवीत आहे.