सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपूल ग्रामपंचायत दि २९ रोजी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी झालेल्या ग्रामसभेत नीरा कालवा अस्तरीकरण विरोधात ग्रामसभेत एकमुखाने ठराव करण्यात आला. व अस्तरीकरण ला विरोध करण्यात आला. तसेच विधवा प्रथाबंद करण्याचा ठराव देखील करण्यात आला.अस्तरीकरण झाले तर विहिरींचे पाणी जाईल.व शेती धंदा धोक्यात येईल.तसेच पाणी आसून देखील शेतीला व गावच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना देखील पाणी राहणार नाही. पाणी संकट निर्माण होण्याचा धोका संभवतो.म्हणून करंजेपूल ग्रामस्थांनी कोणताही राजकीय विषय न करता एक मुखाने अस्तरीकरण करण्यास विरोध दर्शविला. या वेळी करंजेपूल चे सरपंच वैभव गायकवाड. सोमेश्वर कारखान्याचे मा.कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड उपसरपंच अजित गायकवाड करंजे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गायकवाड निलेश गायकवाड, adv. गणेश आळंदीकर, फौजी बाळासाहेब गायकवाड महेश शेंङकर शिवाजी शेंङकर गणेश शेंङकर बुवासाहेब शेंङकर ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.