जावली ! प्रतिनिधी : धनंजय गोरे ! वडाचे म्हस्वे येथे बिबट्याचे दर्शन : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे):-
जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे या ठिकाणी शनिवारी रात्री चव्हाण आळीतील अनिल चव्हाण  यांच्या घराशेजारी असणाऱ्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याचे दर्शन झाले.यामुळे  येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
          शनिवारी रात्री उशिरा म्हसवे गावातील चव्हाण आळी परिसरातील बिबट्या दिसून आला. काही मिनिटात या बिबट्याने खुरड्यातील कोंबड्या फस्त केल्या. गावशेजारी वैराटगडच्या डोंगर जंगलव्याप्त भाग असल्याने भक्ष्याच्या शोधत बिबट्या मानवी वस्तीकडे आला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याआधीही तालुक्यातील करहर परिसरात बिबट्याने दहशत माजवली होती.यामुळे म्हसवे परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने  परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभागाने त्वरित यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
   जावली तालुका हा दुर्गम समजला जातो या भागात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. दाट झाडीमुळे वन्य प्राण्यांचा वावर या परिसरात आहे. आजवर मानवी वस्तीमध्ये बिबट्याचे फारसे दर्शन होत नव्हते. आता बिबट्याने दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
To Top