सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
ओझर्डे ता.वाई गावातील रहिवासी असलेले नामदेव यशवंत जाधव यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी पहाटेच्या दरम्यान ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे .
कै.नामदेव जाधव हे माझी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील आमदार मकरंद पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे .आ.पाटील यांनी नामदेव जाधव यांची
पक्ष त्यागाची असणारी निष्ठेची भुमीका आणी ओझर्डे गावातील गटाशी असणारा प्रामाणीकपणा पाहुन त्यांनी त्यांना ओझर्डे गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्यपदी आणि ओझर्डे गावची अर्थ वाहीनी समजली जाणाऱ्या पदमावती ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड केली होती .
ओझर्डे गावातील माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील आमदार मकरंद पाटील यांच्या गटाचे ते प्रमुख जबाबदार कार्यकर्त्यांन पैकी एक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती .
ओझर्डे गावातील ते एका राजकीय गटाचे कट्टर
समर्थक असुन देखील येथील सर्वच राजकीय गटातील लोकांन बरोबर त्यांचे सलोख्याचे संमध होते .गावातील लहाना पासुन आबाल वृद्धांनसह घरा घरातील सर्वांची ते दररोज भेटणार्या शेकडो माणसांची चौकशी करत असत .त्यांचा स्वभाव मनमिळाऊ संयमशील शांत असा होता .आपल्या शब्दाने कोणी दुखावुन तो आपल्या पासून लांब जाता कामा नये याची ते नेहमीच काळजी घेताना दिसत होते .त्या मुळे त्यांना ओझर्डे ग्रामस्थ आण्णा या नावाने आदराने हाक मारायचे .ओझर्डे गावातील एसटी स्टँडवर त्यांचे सलुनचे दुकान असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा होता . अशा या मोकळ्या मनाच्या असणाऱ्या नामदेव जाधवांच्या मृत्यूने गावाला हादरा बसला आहे.
त्यांच्या निधनाची बातमी सकाळी सकाळी गावभर पसरताच ग्रामस्थांनी त्याच्या निवासस्थानी अखेरचे अंतदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती .त्यांच्या पच्यात पत्नी दोन मुले
दोन मुली नातवंडे असा परिवार आहे .