सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ येथील ढगाईदेवी मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी फोडली असल्याचा प्रकार घडला आहे. काल रात्री हा प्रकार घडला.
सकाळी पुजारी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. काही महिन्यांपूर्वी च मंदिराची दानपेटी फोडल्याचा प्रकार घडला होता. ही दुसरी घटना आहे. मागील चोरट्यांचा तपास अजून लागला नाही तोच मंदिरात दुसऱ्यांदा दानपेटी फोडली आहे. श्रावण महिना असल्याने दानपेटीत ५ हजारांच्या आसपास रक्कम असल्याचे बोलले जात आहे. मात्र चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.