भोर बिग ब्रेकिंग ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! पिराच्या मळ्यात गोठा जळून खाक : दहा जनावरांचा होरपळून मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहराशेजारील पिराचा मळा येथील भोरेश्वर नगर मधील रात्री नऊ च्या  दरम्यान जनावरांचा गोठा जळाल्याने यात दहा पाळीव जनावरे जळून मृत्युमुखी झाल्याची घटना घडली.
              भोर शहरा शेजारील पिरचा मळा  येथील भोरेश्वर नगर येथे शेतकरी सुधीर चंद्रकांत तारू यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागून ५ म्हैसी,२ बैल,२ शेळी व १ रेडुक अशी एकूण दहा जनावरे भाजून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम भोर नगरपरिषद यांच्याकडून सुरू आहे. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने गोटा पूर्णपणे जळून खाक झाला आहे तर त्यातील जनावरही मृत्युमुखी पडली आहेत.
फोटो पाठवीत आहे.
                              
To Top