पुणे-बेंगलोर हायवे ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकटे यांच्या भावाचा अपघातात मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के 
पुणे- सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ता. भोर येथे दुचाकी स्वाराला मोटर कारणे धडक दिली.यामध्ये दुचाकी वाहन चालक रस्त्यावर पडले असता  पाठीमागून आलेल्या ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला.श्रीकांत बलभीम मोकाटे (वय-६५ रा. कोथरूड पुणे) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव असून कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे ते मोठे बंधू होत.
   राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत मोकाटे हे त्यांच्या दुचाकीवरून पुण्याहून साताऱ्याकडे निघाले होते.शनिवार दि.२७ सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान ते गोगलवाडी फाटा सोडून पुढे आले असता पाठीमागून आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार झलक दिली.यामध्ये मोकाटे दुचाकी वरून खाली पडले.त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रक त्यांच्या अंगावरून गेला त्यात श्रीकांत मोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेले मोकाटे यांना उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अपघातातील चालकाला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास राजगड पोलीस करीत आहेत.
                                     
To Top