भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! भाटघर धरण परिसरातील खंडोबा माळावर बिबट्याचा वावर : वाहन चालक नागरिकांमध्ये घबराहट

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर शहराशेजारील भाटघर धरण परिसरातील इंगवली ता.भोर येथील खंडोबा माळावरील पर्यटन स्थळ असलेल्या नेकलेस पॉईंट जवळ भोर -पुणे महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गावर गुरुवार दि.२५ रात्री अकराच्या दरम्यान वाहन चालकांना बिबट्याने दर्शन झाल्याने परिसरातील वाहनचालक व नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे.
     भोर तालुक्यात मागील सहा महिन्यापूर्वी विसगाव, चाळीसगाव खोरे ,हिरडस मावळ तसेच वेळवंड खोऱ्यात अनेक ठिकाणी नागरिकांना दर्शन झाले होते.तर बिबट्याने काही ठिकाणी शेळी,कुत्रे तसेच गाई मारल्याचे घटना घडल्या होत्या.यानंतर सहा महिने बिबट्या तालुक्यात दिसलाच नव्हता.मात्र गुरुवार दि.२५ भोर-पुणे मार्गावरील खंडोबा माळावरील नेकलेस पॉईंट जवळ रात्रीच्या वेळी वाहन चालकांना बिबट्या रस्त्यावरच दिसल्याने वाहनचालक परिसरातील नागरिक व शेतकरी घाबरून गेले आहेत. नेकलेस पॉईंट जवळील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दाट झाडा- झुडपांमध्ये शिवश्रप्राणी रात्रीच्या वेळी लपून बसतात यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने ही झाडे-झुडपे तोडाव्यात म्हणजे वाहन चालकांना प्रवासासाठी रस्ता खुला होईल अशी दुचाकी व चार चाकी वाहन चालकांकडून मागणी होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात दोन दिवस दिवसा व रात्रीच्यावेळी गस्त घालून पाहणी केली असता बिबट्या तसेच बिबट्या सदृश्य प्राणी आढळून आले नाही.मात्र नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी, वाहन चालकांनी रात्री अपरात्री कामावर ये-जा करताना सावधगिरीने वाहन चालवावे तसेच वाहतुकीच्या मार्गावर हिंस्र प्राणी दिसल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन अरुण डाळ वनपरिमंडल अधिकारी (नसरापूर -भोर) यांनी केले आहे.
----------------------
नशीब बलवत्तर म्हणून दुचाकी वाहन चालक बचावला
रात्रीच्या वेळी गुरुवार दि.२५ कामावरून सुटून घरी जात असताना एक वृद्ध वाहन चालकाच्या समोरच नेकलेस पॉईंट जवळ बिबट्या काही अंतरावर येऊन उभा राहून झाडा-झुडपांमध्ये निघून गेला. नशीब बलवत्तर म्हणून यातून हे आजोबा बचावल्याचे वाहनचालक संतोष खंडाळे( उत्तरा सीड्स केतकावळे कामगार) यांनी सांगितले.
                                      
To Top