सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मानाचा गणपती ब्राह्मणंशाही वाई आणि माऊली ब्लड बँक सातारा यांच्या सयुक्त विद्यमाने आजोजित केलेल्या रक्तदान शिबीर कृष्णाबाई मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले.
शिबिराचा शुभारंभ वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक कष्णा पवार यांच्याहस्ते फीत कापुन व पोलीस उप निरीक्षक श्रीयुत वाळुंज ,माजी नगरसेवक भारतदादा खामकर,धनंजय मलटणे व धनंजय हगीर यांचेहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. मानाचा गणपती मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. धनंजय मलटणे, ज्येष्ठ सभासद भारत ( दादा ) खामकर, प्रमोद दळवी, तसेच डॉक्टर रमनलाल भट्टड आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त् केली.मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष अमोद साळुंखे, उपाध्यक्ष मयुर साबणे,दिनेश खैरे,अशोक साळुंखे, सतीश कर्णे यांनी केले.रक्तदान करणाऱ्या बेचाळीस कार्यकर्त्यांना मंडळातर्फे प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह,भेटवस्तु व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन निखिल सावंत यांनी केले.
या रक्तदान शिबिरास मानाचा गणपती मंडळाचे सर्व सभासद, संघर्ष प्रतिष्टान, शंकरी कट्टा प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले