वाई !सोनगीरवाडी येथील बुवासाहेब मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहन उत्साहात संपन्न

Admin

वाई दि २५ :- जुना मोटार स्टँड गणेशोत्सव मंडळ व गणराज प्रतिष्ठान यांचेवतीने बुवासाहेब मंदिराचा जिर्णोध्दार श्री सोनजाई मंदिराचे पुजारी आनंदगिरीमहाराज यांच्या शुभहस्ते व वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
 साठ वर्षांपुर्वी या परिसरातील ट्रक चालक तसेच गँरेज मालकांनी मिळुन सदर मंदिराची उभारणी केली होती. नागरिकांची व व्यापाऱ्यांची देवस्थानवर नितांत श्रध्दा असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी केली जाते.
जिर्णोद्धार करणेकामी मंडळाचे अध्यक्ष सचिन काळे,उपाध्यक्ष सचिन गाडे,खजिनदार दीपक गायकवाड, अनिल कांबळे,शेखर अवधुत,संदीप पावशे,राजु माने,सुनिल अवधुत, राजु कावडे,सुजित पावशे आदिनी विशेष परिश्रम घेतले.
To Top