सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरील कायम सेवकांची अर्थवाहिनी असलेली किसन वीर साखर कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच वाई खंडाळा -महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मकरंदआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक पार पडली.
अध्यासी अधिकारी म्हणुन वाई येथील श्रीमती जे. एस. जमदाडे यांच्या उपस्थितीत (दि. २५) रोजी झालेल्या मिटींगमध्ये चेअरमन पदाकरिता अजित प्रकाशराव पिसाळ व व्हाईस चेअरमन म्हणुन किशोर अविनाश साळुंखे यांचे अर्ज दाखल झाल्यामुळे चेअरमन म्हणून अजित पिसाळ व व्हाईस चेअरमन पदी किशोर साळुंखे यांनी बिनविरोध नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. निवडीवेळी पतसंस्थेचे संचालक बाळकृष्ण जाधव, संजय जगताप, संजय भोसले, अनिल जाधव, मनोहर साळुंखे, दत्तात्रय जाधव, शांताराम चव्हाण, किरण फाळके, तानाजी महामुनी, सुभाष गायकवाड, अरविंद निकम, सौ. शिला जाधव-शिंदे, सौ. अलका डुबल उपस्थित होते.
किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने किसन वीर पतसंस्थेच्या नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे स्वागत व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगडे, संजय कांबळे, वाई तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन व माजी उपसभापती मदन भोसले, सिद्धेश्वर केंडे, व्यवस्थापक अजित डेरे, प्रमोद जठार, कामगार युनियनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------