सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम उर्फ श्याम काका शरद काशवेद ( वय. ४९ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू होते. मात्र काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले. शाम काका धार्मिक वृत्तीचे होते. गावातील अखंड शिव हरिनाम सप्ताहात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. पंचक्रोशीतील सर्वच जाती-धर्मातील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्याच्या मागे आई वडील, पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.