भोर ! संमेलन संयोजन समितीच्या अध्यक्षपदी भुजंगराव दाभाडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथे होणाऱ्या फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या यंदाच्या संयोजन समितीचे अध्यक्षपदी पत्रकार भुजंगराव दाभाडे यांची निवड झाली आहे.
   फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाचे हे आठवे वर्ष असून त्याच्या नियोजनासाठी नुकतीच संयोजन समिती गठित केली आहे. त्यात अध्यक्ष म्हणून दाभाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.समितीचे उपाध्यक्ष  अशोक शिंदे आणि मुरलीधर कांबळे, सचिव आनंदा जाधव, कोषाध्यक्ष ज्ञानोबा घोणे, सहकोषाध्यक्ष प्रफुल्ल बनसोडे, सर्वांगीण समितीचे अध्यक्ष राहुल गायकवाड यांची निवड झाली आहे .आमदार संग्राम थोपटे स्वागताध्यक्ष आहेत. हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींचे शताब्दी वर्ष आहे त्यामुळे हे संमेलन छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना ,कार्याला ,विचारांना समर्पित आहे. येत्या २६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी विचारांचा जागर भोरमध्ये होणार असल्याचे डॉ. रोहिदास जाधव यांनी सांगितले.
To Top