सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून तथास्तु आय.सी.यू. & मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल वाघळवाडी यांनी आपल्या आजी माजी सैनिक संघटना बारामती तालुका मुख्य शाखा सोमेश्वर नगर येथील सर्व सैनिकांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी आपल्या माजी सैनिकांसाठी सैनिकांचे परिवारासाठी हॉस्पिटलमध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध आहे त्याचा फायदा मिळावा त्यासाठी कोणत्याही उपचारावर किंवा मेडिकल वरती कोणत्याही रक्ततपासणी वरती आजी माजी सैनिकांना 20% डिस्काउंट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमेश्वरनगर येथील तथास्तु हॉस्पिटल नुकतेच लोकांच्या सेवेत दाखल झाले आहे. सुरवातीलाच त्यांनी सैनिकांसाठी 20 टक्के सवलत योजना राबविली आहे.
तसेच लवकरात लवकर ईसीएचएस फैसिलिटी (कमांड हॉस्पिटलशी संलग्नता) उभी करून माजी सैनिकांना जी सिविल हॉस्पिटल सेवा दिली जाते ते उपचार तथास्तु आय सी यु हॉस्पिटल सुद्धा लवकरात लवकर जोडण्यात येतील असे डॉ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.
यानिमित्ताने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचया हस्ते सैनिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. भगवान सोनवणे, शुभांगी पवार, भगवान माळशिकारे उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील सर्व माजी सैनिकांसाठी पुण्याला न
सैनिक संघटनेच्या वतीने तथास्तु हॉस्पिटलचे अभिनंदन व आभार मानण्यात आले.