सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
विशेष लेख------
श्रावणाची अमावस्या.महिनाभर सोमेश्वर मंदिरात परिसरातील भक्तांकडून भाविकांना अन्नदान केले जाते.दररोज मनसोक्त अंगतपंगत होते.बाहेर सृष्टी नटलेली..ओले हिरवे दिवस.लहरी पाऊस इच्छेनुसार हजेरी लावत असतो.सणांनी गच्च भरलेला श्रावण वजाबाकीने सरत असतो.आणि न सांगता अमावस्या येते.श्रावणाची सांगता.त्यादिवशी भल्या विचारांनी एकत्र आलेली,सहकार तत्वांनी बांधलेली करंजे पंचक्रोशीतील राजहंस पत संस्था ही आपला दातृत्वाचा गुण जोपासताना दिसते.आपल्या जवळ आहे ते दुसऱ्याला द्यावे ते ही देवाच्या साक्षीने... छायाचित्रात जी पंगत दिसते ती त्यांची.महात्मा गांधींनी म्हटले आहे की,यापुढे परमेश्वर जन्म घेईल तो भाकरीच्या रुपाने.किंवा संत गाडगेबाबा देवकीनंदन गोपालाचा गजर करत अन्नदान करीत.लुळेपांगळे,अंध हे तर बाबांचे नातेवाईक.ते म्हणत देव दगडात नाही देव माणसांत आहे.मानवतेची पूजा हीच देवाची पूजा असे ते म्हणत.त्यांना मूर्तीपूजा निशिद्ध होती.या समाजसुधारकांच्या विचारांची पताका माझ्या मते राजहंस पत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते.तृप्ततेचा ढेकर देत भाविक दर्शन घेऊन मंदिरातून घराकडे चालू लागतील तेव्हा त्यांचे मन अव्यक्त स्वरुपात क्षणभर का होईना अन्नदाता भव असे म्हणत समाधानाचा सुस्कारा सोडील ...तिच या संस्थेची खरी कमाई आणि पुण्याई ही...याचे श्रेय जाते आदरणीय श्री.धोंडिराम भानुदास सोरटे या संस्थापक अध्यक्षांना व संघटन कौशल्य व व्यवहारचातुर्य, गुणग्राहकता असलेल्या श्री.विजयकुमार माणिकराव सोरटे या व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्वाला...परिसरात वैभवतेचे व समृद्धिचे वारे वाहते करण्यासाठी श्री.सोमेश्वर त्यांना आरोग्य पूर्ण उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना..
.-----------------
श्री.एस.एस.गायकवाड सर, करंजेपूल मो.नं.7768098296
लेखक सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत.