सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : प्रतीनिधी
आदिवासी विकास विभाग ठाणे प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे अंतर्गत गोगवे ता.महाबळेश्वर येथे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा (पहिली ते दहावीपर्यंत) कार्यरत आहे तेथे मुख्याध्यापक म्हणून राजकुमार शरणाप्पा चेंडगे काम पहात आहेत.
गोगवे येथील आश्रमशाळेवर जात आसताना बामणोली गावच्या आश्रमशाळेच्या गेटसमोर दि.५ ऑगस्ट रोजी राजाराम भैरप्पा कुलाळ यांनी गाडी आडवून गळादाबून धक्का बुक्की करून मारहाण केली होती. या प्रकरणी राजाराम भैरप्पा कुलाळ याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.