भोर ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! पाले येथील संगमेश्वर मंदिर एक प्रेक्षणीय स्थळ

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी 
 भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वीसगाव खोऱ्यातील पाले ता.भोर येथील ३ ओढ्यांच्या संगमावर वसलेले तसेच डोंगर रांगांच्या कुशीत असलेले पुरातन काळातील संगमेश्वर मंदिर एक प्रेक्षणीय स्थळ असून या ठिकाणी भाविक तसेच पर्यटक दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी गर्दी करीत असतात.
      तालुक्यात संगमेश्वर मंदिर हे भाविक भक्तांचे धार्मिक स्थळ असून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. डोंगर दऱ्यांच्या कुशीत पुरातन काळापासून वसलेल्या या संगमेश्वर मंदिराचे बांधकाम व सभोवतालचा निसर्गरम्य परिसर बघून पर्यटक तसेच भाविक भक्त भारावून जातो.मंदिर संपूर्णपणे दगडाच्या तोडीत कोरीव नक्षीकाम केलेले असल्याने शिल्पकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.यामुळे मंदिर लांबूनच सर्वांचे लक्ष वेधून घेते.या मंदिरात महशिवरत्रिला पाले  दरवर्षी भव्य असा सप्त्याचा कार्यक्रम सलग सात दिवस पार पडत असतो.तर मंदिर परिसराला तालुक्यासह वीसगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळांचे विद्यार्थी वर्षातून दोन वेळा एक दिवसाच्या पर्यटनासाठी येऊन भेट देत असतात.श्रावणातील चार सोमवारी ग्रामस्थांच्या हस्ते पुजारी मिलिंद म्हसवडे अभिषेक करीत असतात.संगमेश्वर मंदिर हे पंचक्रोशीच्या मध्यभागी तसेच महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्याशेजारी असल्याने मंदिरातील स्वयंभू शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते.

To Top