सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वरनगर या संघाचे फक्त तालुक्यात नव्हे तर राज्यभर सामाजिक योगदान दिले असुनया सैनिकांचे नि:स्वार्थी पणे चालु असलेल्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे मत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यानी व्यक्त केले .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण श्री जगताप यांचे हस्ते झाले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .याप्रसंगी कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष शैलेश रासकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थीत होते. आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,ॲड गणेश आळंदीकर ,उपाध्यक्ष रामचंद्र शेलार ,भगवान माळशिकारे ,सचीव रामदास कारंडे ,राजाराम शेंडकर ,मोहन शेंडकर ,नितीन शेंडकर ,दत्तात्रय चोरगे ,मोहन गायकवाड,किरण सोरटे ,युवराज चव्हाण, अशोक रासकर , गणेश शेंडकर ,मोहन शेंडकर ,दत्तात्रय चोरगे, अनिल चौधरी ,राजाभाऊ थोपटे ,भारत मदने, संजय पडवळ ,पांडुरंग मांडगे, बबन ढोपरे,महेश पाठक ,मोहन गायकवाड ,ज्ञानेश्वर कुंभार,रविंद्र कोरडे आदी आजी माजी सैनिक तसेच सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे आदी मान्यवर उपस्थित होते .
पुरुषोत्तम जगताप पुढे म्हणाले या आजी माजी सैनिक संघाने सैनिक टाकळी पुरग्रस्त असो अथवा सांगली शिरोळ अतिवृष्टी ग्रस्त असो ,महाबळेश्वर परिसरातील दरडग्रस्त असो किवा कोव्हीड काळात सलग दोन वर्ष पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य असो अथवा तक्रार निवारण समिती द्वारे कोर्टात व पोलीस स्टेशनद्वारे मिटवलेले अनेक महत्वपूर्ण तक्रारी असो या आजी माजी सैनिकांच्या सर्व कार्याचे आपण साक्षीदार आहोत त्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे .
प्रास्ताविक मधे ॲड.गणेश आळंदीकर यानी आत्तापर्यंत संस्थापक व जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे मार्गदर्शनाखाली सैनिक संघटनेने राबवलेल्या उपक्रमाची माहीती दिली .
यावेळी कोऱ्हाळे येथील वीर पत्नी शितल बिंटु सुळ यांचा साडी चोळी देवुन सत्कार करणेत आला. तसेच तीसरीतील कृत्तिका किरण सोरटे हिचे देशभक्तीपर गीतावर नृत्य झाले तिलाही अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले .आभार भगवान माळशिकारे यानी मानले.