बारामती ! सोमेश्वरनगर येथे त्रिदल सैनिक संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोस्तव उस्ताहात साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर ता बारामती येथे त्रिदल सैनिक संघाच्या वतीने 
दि १५ ऑगस्ट रोजी  वीरपत्नी पुष्पलता पवार यांच्या हस्ते तिरंगा फडकण्यात आला, 
         यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भट्टड़ होते, तसेच प्रमुख उपस्थितीत  Adv गिरमे डॉ. सचिन शहा, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड उपस्थित होते. वीरपत्नी पुष्पलता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. Adv गिरमे साहेब यांनी आपल्या भाषणात सैनिक हा ड्यूटी वर असताना देशसेवेचे कर्तव्य पार पाडत असताना निवृत्त झाल्यावर ही समाजाशी बांधिलकी जपत देशसेवा करत असतो.असे मत व्यक्त केले आणि हीच भावना जपत आजी माजी सैनिकांच्या साठी सेवा देत असताना त्यांच्या कडून कोणतेही नोटरी शुल्क घेत नाहीत. तसेच समाजातील दिव्यांगांसाठी ही फी आकरत नाहीत, तसेच गोरगरिबांना ही मोफत सेवा देतात. यामुळे त्रिदल सैनिक संघ बारामती मार्फत त्यांना आवर्जुन आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला.
        निरा येथील डॉक्टर भट्टड हे पण आजी माजी सैनिकांच्या कडुन तपासणी फी घेत नाहीत त्यांचा ही संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेचे सदस्य सेवानिवृत्त सुभेदार मेजर संजय चव्हाण यांना १५ ऑगस्ट रोजी लेफ्टनंट पदी प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार घेण्यात आला. त्रिदल सैनिक संघ बारामती चे अध्यक्ष  प्रशांत शेंडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटना स्थापन करण्याचा उद्देश सांगत आतापर्यंत २०० जणांना एकत्रित करून ९ बचत गट स्थापन केले असुन त्यांना आर्थिक सक्षम कसे केले जाईल यावर भर दिला जाईल. तसेच संघटना कार्यालयात माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कार्यालयात ज्या सुविधा असतात त्या ऑनलाईन भरण्याची सुविधा सुरु केलेली आहे असे सांगितले.
ओमकार जगताप आणि मारुती पांडूळे यांनी फ्री हेल्थ चेक अप ठेवले होते. याचा लाभ अनेक परिवारातील सदस्यांनी घेतला.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश गायकवाड यांनी केले आणी आभार संघटनेचे कोषाध्यक्ष विजय गोलांडे साहेब यांनी केले. या कार्यक्रमात मारुती पांडुळे ,मेनीनाथ होळकर, उमेश लकडे, सतीश गाढवे, लालासाहेब तांबे, गणेश देवकर, विजय शेंडकर, प्रकाश चौधरी, रोहित जगताप, सचिन जाधव, विक्रम धुर्वे , नाना बारवकर, सागर रासकर, सचिन शितोळे, दादा मोटे, यादव, ओमकार जगताप यांनी उपस्थिती दाखवली तसेच बहुसंख्येने महिला ही उपस्थित होत्या.
To Top