सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुरूम(साळोबावस्ती) येथील स्मशानभूमीत विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कामासह वृक्षारोपणासाठी पुढाकार घेणाऱ्या वाणेवाडी येथील साद संवाद स्वच्छता ग्रुप व मुरुम ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्याने नव्यानेच बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत वड, पिंपळ, वावळ, कांचन, आपटा, कडुलिंब, अर्जुन, बकूळ, नांदरुक अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करुन स्वातंत्र्यदिन साजरा केला. साद, संवाद, स्वच्छता ग्रूपचे समन्वयक डी. वाय. जगताप, शशिकांत जेधे, ॲड. नवनाथ भोसले, मनोज दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांची याकामी मोठी मदत झाली. यावेळी मुरूमचे उपसरपंच निलेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी शहाजहान बाणदार, शिक्षक दादासाहेब भंडलकर, रोहित पवार, फत्तेसिंह चव्हाण, बाळासाहेब कुंभार, दीपक शिंदे, सोसायटीचे संचालक धोंडीबा भंडलकर, कांतीलाल भंडलकर, पत्रकार युवराज खोमणे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. साळोबावस्ती येथे जिल्हा परिषदेच्या वतीने सभापती प्रमोद काकडे यांच्या सहकाऱ्याने व सोमेश्वर कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीचे काम दर्जेदार झाल्याने येथील दोन हजार लोकवस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कै. प्रकाश पवार यांनी या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. याठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी साद संवादने पुढाकार घेतला. याकामी पुढारीचे पत्रकार युवराज खोमणे यांचे सहकार्य लाभले.