भोर ! अमृत महोत्सवानिमित्त भोरला १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दीनी सामाजीक कार्यकर्ते युवा उदयोजक अनिल सावले यांच्या वाढदिवसानिमीत्त भोर- वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिलनाना सावले युवामंच भोर व पुणे ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने भोर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क पार पाडला.
     रक्तदानाचा हक्क बजावताना भोर शहर,विसगाव, चाळीसगाव खो-यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत राहून रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला. यावेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, तालुका खाटीक संघटनेचे तालकाध्यक्ष विनय पलंगे, मनोज धुमाळ, सरपंच प्रमोद थोपटे, संजय खामकर, डॉ. संजय वाडकर, मोहन चव्हाण, अमित दरेकर उपस्थित होते. रक्तदान शिबीराचे आयोजन  नितीन वरे , सचिन  म्हस्के, सचिन उल्हाळकर,समीर भिलारे व मित्र परीवाराने  केले होते.

To Top