कौतुकास्पद.. ! प्रतिनिधी : संतोष म्हस्के ! उत्कृष्ठ प्रांताधिकारी व उत्कृष्ठ तहसीलदार.....! भोर तालुक्याने पटकावला मान : राजेंद्र कचरे व सचिन पाटील पुरस्काराने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर - संतोष म्हस्के
भोर तालुक्यात नेहमीच उत्कृष्ठ कामगिरी करून पारदर्शक व तत्परतेने सेवा उपलब्ध करून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणारे भोर तालुक्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे उत्कृष्ट महसूल अधिकारी तर तहसीलदार सचिन पाटील यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्काराने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
      महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी उत्कृष्ट अव्वल कारकून मंदार नेरेकर ,उत्कृष्ट महसूल सहाय्यक श्रीमती के.पी.पाटील उत्कृष्ट शिपाई राकेश ओहोळ तर उत्कृष्ट तलाठी राजपाल यादव यांनाही डॉ. देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पुरस्कारर्थिंचे तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे.
To Top