सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
तब्बल आडीच ते तीन वर्षा नंतर वाई शहरात साजरी होणार्या नाग पंचमी या सणाचा आनंद घेण्यासाठी कृष्णा नदी काठावर असलेल्या साठे मंगलकार्यालयाच्या पटांगणात हजारोंच्या संख्येने महिलांच्या गर्दीचा महापूर पाहवयास मिळत होता महिलांची वाढती गर्दी पाहून सुरक्षेच्या कारणास्तव वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुमडे यांनी किसनवीर चौकासह कृष्णा नदी काठावर वाई पोलिसांचा ताफा घेऊन चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता .त्या मुळे या सणात महिलांचा बिनधास्त पणा दिसुन येत होता .
सविस्तर वृत्त असे कि गेले आडीच ते तीन वर्षां पासून वाई शहरा सह तालुक्यातील गावांन मध्ये कोरोनो रोगाने थैमान घातले होते त्या मुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरु करुन साजरे होणार्या सर्वच सणांन वर बंदी घातली होती त्या मुळे गेल्या दोन तीन वर्षांपासून महिलांचे कुठलेच सण साजरे न झाल्याने महिला वर्गाच्या आनंदाची कुच॔बना झाल्याने नाराजीचा सुर ऊमटताना दिसत होते .पण या वर्षी सर्वच सण ऊत्साहात साजरे करण्याची प्रशासनाची परवानगी असल्याने वाई तालुक्या सह वाई शहरात महिला वर्गांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पंचमीचा सण साजरा करुन त्याचा पुरेपूर आनंद घेताना महिला वर्गा मध्ये ऊत्साहाचे वातावरण दिसून येत होते. वाई शहरातील हजारोंच्या संख्येने महिला वर्गांची
या पंचमीच्या सणाला ऊपस्थिती होती .या वेळी फुगड्या गाण्यांच्या तालावर फेर व हळदी
कुंकवाची देवाण घेवाण करत महिला मनसोक्त आनंद घेताना दिसत होत्या .
COMMENTS