सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ या हंगामाच्या मिल रोलरचे पुजन उद्या बुधवार (दि.3) रोजी सकाळी अकरा वाजता वाई खंडाळा -महाबळेश्वर तालुक्याचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा बँकचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
शिंदे पुढे म्हणाले की, कारखान्याचा सन २०२२-२३ हा हंगाम पुर्ण क्षमतेने सुरू करण्याच्यादृष्टीने आमच्या व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. मिल रोलर पुजन करून कारखाना सुरू करण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल टाकीत असल्याचे सांगून यंदाचा हंगाम सभासद शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नातून यशस्वी करणारच असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, कार्यकर्ते, वाहतुक कंत्राटदार, तोडणी मशिन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.
COMMENTS