मोठी बातमी ! 'सोमेश्वर'ने फोडली अंतिम उसदाराची कोंडी ! गेल्या वर्षीच्या उसाला मिळणार तीन हजार प्लस दर

Admin

 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षीच्या अंतिम ऊसाची कोंडी फोडत उसाला ३ हजार २० रुपये दर जाहीर केला आहे. 
       सोमेश्वर ने एफआरपी पेक्षा जादा १५३ रुपये दिले आहेत. गेल्या वर्षी गाळप केलेल्या सोमेश्वर कारखान्याने तसेच माळेगाव व जरंडेश्वर कारखान्याला गाळापासाठी दिलेल्या १४ लाख ४६ हजार टन उसाला हा दर जाहीर करण्यात आलेला आहे. सोमेश्वर ने यापूर्वीच टनाला २८६७ अदा केले आहे आहे. आता उर्वरित १५३ रुपये दिवाळीच्या आसपास अदा करण्यात येणार आहे. तसेच  
एफआरपी वरील १ कोटी १० लाख रुपयांचे व्याज देखील सभासदांना मिळणार आहे. 
           आज संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, शैलेश रासकर, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, तुषार माहुरकर, अजय कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top