सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
मागील आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने शुक्रवार दि.१२ दुपारी दीड वाजता पूर्ण क्षमतेने भाटघर धरण भरले असून धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या ७ हजार ५०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
भाटघर धरण परिसरात सध्याही रिमझिम पाऊस सुरू असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना अगोदर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भाटघर धरणाला एकूण ८१ दरवाजे असून यातील स्वयंचलित ४५ दरवाजातून विसर्ग सुरू आहे.